Snapdragon 8 Elite Processor Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/tag/snapdragon-8-elite-processor/ Krushi News18 Mon, 18 Nov 2024 13:48:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.krushinews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-Krushi-News18-1-32x32.png Snapdragon 8 Elite Processor Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/tag/snapdragon-8-elite-processor/ 32 32 202360513 पाण्याखाली फोटो काढणारा फोन भारतात; जबरदस्त डिस्काउंटसोबत किंमत फक्त एवढीच https://www.krushinews18.com/2024/11/18/snapdragon-8-elite/ https://www.krushinews18.com/2024/11/18/snapdragon-8-elite/#respond Mon, 18 Nov 2024 13:48:21 +0000 https://www.krushinews18.com/?p=140 Snapdragon 8 Elite : Realme GT 7 Pro (First Snapdragon 8 Elite Processor Based Phone) स्मार्टफोन 26 नोव्हेंबरला ...

Read More..

The post पाण्याखाली फोटो काढणारा फोन भारतात; जबरदस्त डिस्काउंटसोबत किंमत फक्त एवढीच appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Snapdragon 8 Elite : Realme GT 7 Pro (First Snapdragon 8 Elite Processor Based Phone) स्मार्टफोन 26 नोव्हेंबरला भारतीय बाजारात लाँच होणार आहे. परंतु त्याआधी या हँडसेटची प्री बुकिंग 18 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजल्यापासून अ‍ॅमेझॉन आणि ऑफलाइन माध्यमातून सुरु होईल. प्री बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी कंपनीनं डिस्काउंटची घोषणा देखील केली आहे.

 

दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

 

26 नोव्हेंबरला भारतात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलीट प्रोसेसर असलेला पहिला फोन भारतीयांच्या भेटीला येणार आहे. चिनी बाजारात आलेला Realme GT 7 Pro स्मार्टफोन भारतात येत आहे आणि आता या स्मार्टफोनची प्री-बुकिंग डेट समोर आली आहे. कंपनीनं सांगितलं आहे की 18 नोव्हेंबर दुपारी 12 वाजल्यापासून अ‍ॅमेझॉन आणि ऑफलाइन स्टोर्सवर रियलमी जीटी 7 प्रोची प्री-बुकिंग सुरु होईल. तर 26 नोव्हेंबरच्या लाँच नंतर ग्राहक रियलमी डॉट कॉमवर हा हँडसेट प्री-बुक करू शकतील.

Realme GT 7 Pro प्री-बुकिंग ऑफर्स

अ‍ॅमेझॉन आणि रियलमीच्या वेबसाइटवर 1,000 रुपयांमध्ये रियलमी जीटी 7 प्रो प्री-बुकिंग करता येईल. इथून प्री बुक करणाऱ्या ग्राहकांना 3000 रुपयांपर्यंत बँक ऑफर्स, 12 महीने नो-कॉस्ट ईएमआय, एक वर्ष स्क्रीन डॅमेज इन्शुरन्स आणि एका वर्षाची अतिरिक्त वॉरंटी हा स्मार्टफोन ऑफलाइन 2000 रुपयांमध्ये प्री-बुक करता येईल. त्यावर 3000 रुपयांच्या बँक ऑफर्स, 12 महीने नो कॉस्ट ईएमआय, 24 महिन्यांपर्यंत ईएमआय ऑफर, एक वर्षाचा स्क्रीन डॅमेज इन्शुरन्स आणि एक वर्षाची अतिरिक्त वॉरंटी मिळेल.

 

सरकारचा मोठा निर्णय, आता या लोकांना लागणार नाही टोल टॅक्स

 

Realme GT 7 Pro चे स्पेसिफिकेशन

स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा 2K Eco2 Sky डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले 120 हर्टज रिफ्रेश रेट, 2600 हर्टज इंस्टंट टच सॅम्पलिंग रेट आणि 6000 निट्स पर्यंतच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. यावर क्रिस्टल आर्मर ग्लासची लेयर देण्यात आली आहे.

परफॉर्मन्ससाठी क्वॉलकॉमचा नवीन Snapdragon 8 Elite चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 16 जीबी LPDDR5X रॅम आणि 1 टीबी पर्यंत UFS 4.0 स्टोरेज मिळते. हा अँड्रॉइड 14 आधारित रियलमी युआय 6.0 वर चालतो. यात पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी IP69 रेटिंग देण्यात आली आहे.

 

आधारकार्डबाबत सर्वात मोठी बातमी! ‘हे’ केलं

नसेल तर लगेच करा, नाहीतर

 

स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे. ज्यात 50MP सोनी IMX906 प्रायमरी सेन्सर, 8MP वाइड अँगल लेन्स आणि 3x ऑप्टिकल झूमसह 50MP चा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. हा 120x डिजिटल झूमला सपोर्ट करतो. यात अंडरवॉटर फोटोग्राफी मोड देण्यात आला आहे, जो पाण्यात देखील फोटो क्लिक करू शकतो.

The post पाण्याखाली फोटो काढणारा फोन भारतात; जबरदस्त डिस्काउंटसोबत किंमत फक्त एवढीच appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/11/18/snapdragon-8-elite/feed/ 0 140