Bitcoin Price Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/tag/bitcoin-price/ Krushi News18 Tue, 19 Nov 2024 09:05:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 https://www.krushinews18.com/wp-content/uploads/2024/11/cropped-Krushi-News18-1-32x32.png Bitcoin Price Archives - कृषि वार्ता 18 https://www.krushinews18.com/tag/bitcoin-price/ 32 32 202360513 बिटकॉइनमधील जोरदार तेजीचं कारण काय? जाणून घ्या महत्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे https://www.krushinews18.com/2024/11/19/bitcoin-cryptocurrency/ https://www.krushinews18.com/2024/11/19/bitcoin-cryptocurrency/#respond Tue, 19 Nov 2024 09:05:20 +0000 https://www.krushinews18.com/?p=146 Bitcoin Cryptocurrency : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना विजय मिळाल्यानंतर बिटकॉइनच्या मूल्यात मोठी तेजी येत, ते 80 ...

Read More..

The post बिटकॉइनमधील जोरदार तेजीचं कारण काय? जाणून घ्या महत्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
Bitcoin Cryptocurrency : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना विजय मिळाल्यानंतर बिटकॉइनच्या मूल्यात मोठी तेजी येत, ते 80 हजार डॉलरच्या (जवळपास 67 लाख रुपये) वर पोहोचलं आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला जगाचं ‘क्रिप्टो कॅपिटल’ बनवण्याचं आश्वासन दिलं होतं.

बिटकॉइन ही जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. बिटकॉइनच्या मूल्यात यावर्षी 80 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. फक्त बिटकॉइनच नव्हे तर डॉजकॉइनसारख्या इतरही क्रिप्टोकरन्सीच्या मूल्यात जोरदार वाढ झाली आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक असलेले इलॉन मस्क डॉजकॉइनला प्रोत्साहन देतात. 2021 मध्ये जो बायडन सरकारनं जेन्सलर यांना सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनचं अध्यक्ष केलं होतं. त्यांनी क्रिप्टोकरन्सीच्या मार्केटचं कंबरडं मोडलं होतं.

स्टोन एक्स फायनान्शियलचे बाजार विश्लेषक मॅट सिंपसन यांनी बीबीसीला सांगितलं की जर ट्रम्प सरकारनं क्रिप्टोकरन्सीला डिरेग्युलेट केलं म्हणजे मोकळीक दिली तर बिटकॉइन चं मूल्य एक लाख डॉलरच्या वर जाऊ शकतं. या सर्व पार्श्वभूमीवर क्रिप्टोकरन्सीशी संबंधित प्रश्न आणि त्यांची उत्तरं जाणून घेऊया.

 

सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर

➡ इथे क्लिक करून पहा ⬅

 

1) क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?

मोठे किंवा शक्तीशाली कॉम्प्युटर्स एका खास प्रकारच्या अल्गोरिदमचा वापर करतात. याला क्रिप्टोकरन्सीच्या दुनियेत मायनिंग म्हटलं जातं. या मायनिंग नंतर क्रिप्टोकरन्सी निर्माण होते.

बिटकॉइनसारख्या जवळपास चार हजार व्हर्च्युअल करन्सी किंवा आभासी चलनं बाजारात उपलब्ध आहेत. या सर्वच आभासी चलनांना क्रिप्टोकरन्सी म्हटलं जातं.

सर्वसाधारण चलनांचं नियमन किंवा नियंत्रण एखादी संस्था करते. उदाहरणार्थ भारतीय रुपयाचं नियमन रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया करते. प्रत्येक देशात या प्रकारच्या बॅंका किंवा संस्था असतात.

रिझर्व्ह बॅंक रुपयाची म्हणजे नोटांची छपाई करते. किती नोटा आणि नाणी छापली गेली, बाजारात किती नोटा उपलब्ध आहेत, त्यांचं स्वरुप काय आहे इत्यादी सर्व गोष्टींचा हिशोब, माहिती रिझर्व्ह बँक ठेवत असते.

 

सरकारचा मोठा निर्णय, आता या लोकांना लागणार नाही टोल टॅक्स

 

मात्र, क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत असं होत नाही. कोणतीही एखादी विशिष्ट संस्था क्रिप्टोकरन्सीचं नियमन करत नाही किंवा त्यावर नियंत्रण ठेवत नाही.

2) क्रिप्टोकरन्सी कशाप्रकारे काम करते?

क्रिप्टोकरन्सीचं प्रत्येक ट्रान्झॅक्शन किंवा व्यवहाराचा डेटा जगभरातील वेगवेगळ्या कॉम्प्युटरमध्ये नोंदवला जातो.

या सोप्या भाषेत समजून घ्यायचं म्हणजे, एक खूप मोठी खोली आहे, ज्यात सर्व जगातील लोक बसलेले आहेत. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीनं क्रिप्टोकरन्सीचा व्यवहार केला तर त्याची माहिती त्या खोलीत असलेल्या सर्व लोकांना होते. म्हणजेच त्या व्यवहाराची नोंद एका विशिष्ट ठिकाणी होत नाही.

क्रिप्टोकरन्सीची माहिती जगभरातील वेगवेगळ्या कॉम्प्युटरमध्ये ठेवली जाते. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीत बॅंकासारख्या तिसऱ्या घटकाशी आवश्यकता नसते.

2008 मध्ये बिटकॉइन ही क्रिप्टोकरन्सी तयार झाली होती. 2008 पासून आतापर्यंत बिटकॉइनची कोणत्या वॉलेटमध्ये आणि कधी खरेदी किंवा विक्री झाली याची सर्व माहिती उपलब्ध आहे.

यातील एक विचित्र बाब इतकीच आहे की ते वॉलेट कोणत्या व्यक्तीचं आहे हे मात्र कळत नाही.

 

दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर या तारखेला पहिलं पेपर

 

3) व्हर्च्युअल अ‍ॅसेट काय असतं?

व्हर्च्युअल किंवा आभासीचा अर्थ असतो की ज्या गोष्टीला प्रत्यक्षात स्पर्श करता येत नाही. तर अॅसेट म्हणजे मालमत्ता किंवा संपत्ती.

बाजारात बिटकॉइन, इथेरियम, डॉजकॉइन सारख्या इतर विविध क्रिप्टोकरन्सी आहेत. या सर्वच क्रिप्टोकरन्सीना व्हर्च्युअल अॅसेट म्हटलं जातं. यात नॉन फंजिबल टोकन म्हणजे एनएफटी चा देखील समावेश आहे.

उदाहरणार्थ जगात जो सर्वात पहिला एसएमएस पाठवण्यात आला होता, त्याला एका व्यक्तीनं सांभाळून ठेवून त्याचं नॉन फंजिबल टोकन तयार केलं आहे.

अनेक पेंटिग्स किंवा चित्रांचं देखील लोकांनी एनएफटी केलं आहे. या एनएफटीची व्हर्च्युअल म्हणजे आभासी जगात विक्री देखील केली जाऊ शकते.

4) डिजिटल वॉलेट काय असतं?

कोणताही माणूस रोख रक्कम म्हणजे नोटा किंवा नाणी आपल्या पाकिटात ठेवतो. त्याचप्रकारे क्रिप्टोकरन्सी ठेवण्यासाठी एका वॉलेटची गरज असते. आता ही व्हर्च्युअल किंवा डिजिटल दुनिया असल्यामुळे क्रिप्टोकरन्सी ठेवण्यासाठीचं वॉलेट देखील डिजिटल असतं.

डिजिटल वॉलेट उघडण्यासाठी पासवर्ड असतो. ज्याच्याकडे डिजिटल वॉलेटचा पासवर्ड असतो, तो ते वॉलेट उघडून त्यातील क्रिप्टोकरन्सीची विक्री करू शकतो किंवा खरेदी करू शकतो.

या डिजिटल वॉलेटला एक पत्ता दिलेला असतो आणि तो 40 ते 50 अंकांचा असतो. यात अल्फाबेट आणि न्युमरिक दोन्ही बाबींचा समावेश असतो.

प्रत्येक डिजिटल वॉलेटचा पत्ता युनिक असतो. असे अब्जावधी वॉलेट डिजिटल किंवा क्रिप्टोकरन्सीच्या दुनियेत आहेत.

 

आधार कार्डाऐवजी आता हा पुरावा महत्वाचा सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय जाणून घ्या कोणतं कागदपत्र?

 

5) ब्लॉकचेन काय असतं?

उत्तर – क्रिप्टोकरन्सीशी निगडीत कोणतंही ट्रान्झॅक्शन किंवा व्यवहार होतो तेव्हा त्याची नोंद ब्लॉकचेनमध्ये होते. हे एक प्रकारचं डिजिटल तंत्रज्ञान असतं. एका ब्लॉकमध्ये मर्यादित व्यवहारच नोंदवले जाऊ शकतात.

एक ब्लॉक भरल्यानंतर व्यवहारांची नोंद दुसऱ्या ब्लॉकमध्ये होते. अशाप्रकारे एक ब्लॉक पुढच्या ब्लॉक शी जोडला जातो. ही एक प्रकारची साखळीच तयार होते. म्हणून याला ब्लॉकचेन म्हणतात.

6) क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज काय असतं?

क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज म्हणजे असं व्यासपीठ जिथे एखादी व्यक्ती क्रिप्टोकरन्सीची खरेदी किंवा विक्री करतो. याच ठिकाणी रुपयाचं रुपांतर क्रिप्टोकरन्सीमध्ये केलं जातं.

जेव्हा तुम्हाला एक क्रिप्टोकरन्सी विकून दुसरी क्रिप्टोकरन्सीची खरेदी करायची असेल तर ते देखील क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजमध्येच होतं.

ज्याप्रकारे खरेदी किंवा शॉपिंग करण्यासाठी ऑनलाइन व्यासपीठांचा, अॅपचा वापर केला जातो. त्याचप्रकारे क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी क्रिप्टो एक्सचेंजचा वापर केला जातो.

या व्यासपीठांवर क्रिप्टोकरन्सी खरेदी करणारे असतात आणि त्याची विक्री करणारे देखील असतात.

7) क्रिप्टोकरन्सीद्वारे होणाऱ्या कमाईवर कर भरावा लागतो का?

याचं उत्तर ‘हो’ असंच आहे. क्रिप्टोकरन्सीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर भारतात 30 टक्के प्राप्तिकर भरावा लागतो. प्रत्येक देशात याचं स्वरुप वेगवेगळं असतं.

2022 पासून भारतात क्रिप्टोकरन्सीवर प्राप्तिकर लागू करण्यात आला होता. समजा एखाद्या व्यक्तीनं एक लाख रुपयांची क्रिप्टोकरन्सी विकत घेतली आणि दोन महिन्यांनी त्यानं ती दोन लाख रुपयांना विकली.

याचाच अर्थ या व्यवहारातून त्याला एक लाख रुपयांचा नफा झाला. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला या एक लाख रुपयांच्या नफ्यावर 30 टक्के म्हणजे 30 हजार रुपये प्राप्तिकर भारत सरकारकडे भरावा लागेल.

 

रेशन कार्डवरील धान्य झाले कमी? 1 तारखेपासून नवीन नियम लागू

 

8) प्राप्तिकराव्यतिरिक्त क्रिप्टोकरन्सीवर एक टक्का टीडीएस लागतो का?

समजा एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीकडून एक लाख रुपयांची क्रिप्टोकरन्सी खरेदी केली.

तर अशा वेळी पहिली व्यक्ती एक टक्का टीडीएस म्हणजे एक हजार रुपये वजा करून 99 हजार रुपयांचं पेमेंट करेल.

त्याला हे एक हजार रुपये भारत सरकारकडे टीडीएस च्या रुपात जमा करावे लागतील. जे नंतर कराच्या रुपात क्रेडिट केलं जाऊ शकतं.

यातून सरकारकडे क्रिप्टोकरन्सी च्या व्यवहाराची माहिती राहणार आहे.

9) क्रिप्टोकरन्सी भेट म्हणून दिल्यावर देखील कर भरावा लागेल का?

हो! काही बाबतीत जवळच्या नातेवाईकांना भेटवस्तू दिल्यावर कर लागत नाही. मात्र भारतात क्रिप्टोकरन्सी भेटवस्तूच्या श्रेणीतून वगळण्यात आलं आहे.

म्हणजेच जर तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला, कुटुंबातील कोणाला क्रिप्टोकरन्सी भेट म्हणून दिली तर त्यावर तुम्हाला कर भरावा लागेल.

10) जर क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारात तोटा झाला तर काय होईल?

वार्षिक उत्पन्न दाखवताना क्रिप्टोकरन्सीमध्ये झालेल्या नफा किंवा तोट्याला दाखवता येत नाही.

जर तुम्हाला तुमच्या व्यवसायातून पाच लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे आणि क्रिप्टोकरन्सीतून एक लाख रुपयांचं नुकसान झालं असेल.

तर अशा स्थितीत तुम्हाला पाच लाख रुपयांवर प्राप्तिकर भरावा लागेल. यात तुम्ही तुमचं उत्पन्न चार लाख रुपये असल्याचं दाखवू शकत नाही.

तुम्हाला क्रिप्टोकरन्सीत झालेला तोटा जोडून घेता येणार नाही किंवा तशी वजावट मिळवता येणार नाही.

11) पेटीएम सारख्या ई-वॉलेटमधील पैशांमध्ये आणि डिजिटल रुपीमध्ये काय फरक आहे?

डिजिटल रुपीबद्दल सांगायचं तर, तुमच्या खिशात जितके पैसे असतील, नोटा किंवा नाणी असतील ते डिजिटल रुपात तुमच्या फोनमध्ये किंवा वॉलेटमध्ये राहतील.

म्हणजेच तुमच्याकडील पैसे डिजिटल स्वरूपात रूपांतरित होतील. तुम्हाला बॅंकेची आवश्यकता पडणार नाही. सद्यपरिस्थितीत कोणतंही पेमेंट करण्यासाठी एखादी बॅंक किंवा एखाद्या पेमेंट वॉलेट द्वारे करावं लागतं.

मग यात पेटीएम किंवा इतर त्यासारख्याच ई-वॉलेट कंपन्या मध्यस्थाचं काम करतात. डिजिटल रुपी मध्ये असं असणार नाही. ज्याप्रकारे एरवी तुम्ही रोख रकमे द्वारे देवाण-घेवाण करता, तसंच डिजिटल रुपी मध्ये देखील करता येईल.

डिजिटल रुपी ही एक डिजिटल करन्सी आहे. ती ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात हे कळू शकेल की डिजिटल करन्सी कुठून कुठून तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. यात करन्सीचा ट्रॅक ठेवता येणार आहे.

सर्वसाधारण करन्सीप्रमाणेच डिजिटल रुपी देखील रिझर्व्ह बॅंकेकडून जारी केली जाते.

12) डिजिटल रुपी आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये काय फरक आहे?

बिटकॉइनची संख्या मर्यादित आहे. म्हणजेच जगात एकूण 2 कोटी 10 लाखांहून अधिक बिटकॉइन नसू शकतात. कारण बिटकॉइनचा पुरवठा मर्यादित स्वरूपाचा आहे. म्हणूनच जेव्हा मागणी वाढू लागते तेव्हा बिटकॉइनचं मूल्य वाढू लागतं.

पाच वर्षांपूर्वी बिटकॉइनचं मूल्य 22 हजार रुपये होतं. तर फेब्रुवारी 2022 मध्ये ते वाढून जवळपास 30 लाख रुपये झालं. तर आज बिटकॉइनचं मूल्य 80 हजार डॉलर म्हणजेच जवळपास 67 लाख रुपयांहून अधिक झालं आहे.

बिटकॉइनच्या मूल्यात चढउतार होत असतात. बहुतांश क्रिप्टोकरन्सींची एक निश्चित संख्या असते. त्या संख्येहून अधिक क्रिप्टोकरन्सी बनवता येत नाही.

तर दुसरीकडे डिजिटल रुपीच्या मूल्यात कोणताही बदल होत नाही. कारण डिजिटल रुपी हे प्रत्यक्षातील रुपयाचंच डिजिटल स्वरुप असतं. म्हणजेच, डिजिटल रुपीच्या स्वरुपातील दहा रुपये अनेक वर्षांनी देखील दहा रुपयेच राहतील. डिजिटल रुपीमुळे फक्त आपल्या व्यवहारांच्या किंवा पैशांच्या देवाणघेवाणीच्या पद्धतीत बदल होईल.[Source: BBC Marathi]

The post बिटकॉइनमधील जोरदार तेजीचं कारण काय? जाणून घ्या महत्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे appeared first on कृषि वार्ता 18.

]]>
https://www.krushinews18.com/2024/11/19/bitcoin-cryptocurrency/feed/ 0 146