एलजीपीच्या किंमतीत होणार बदल :-
ऑइल मार्केटिंग कंपनी ही प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल करते. याचा परिणाम सर्वसामान्यांना सहन करावा लागतो. त्याप्रमाणे १ डिसेंबर रोजी एलजीपी सिलिंडरच्या किंमतीत बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात १९ किलोग्रॅमच्या कर्मशियल सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली होती.
आधारकार्ड फ्री अपडेट :-
आधारकार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत वाढवण्यात आली. आधारकार्ड धारकांना १४ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन प्रक्रियेद्वारे कोणत्याही शुल्काशिवाय नाव, पत्ता, जन्मतारखेत बदल करता येणार आहे. या तारखेनंतर अपडेट करणाऱ्यांना पैसे मोजावे लागणार आहे.
क्रेडिट कार्डचे निमय :-
देशातील सर्वात मोठी बँक ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. बँक १ डिसेंबरपासून क्रेडिट कार्डाच्या नियमात बदल करणार आहे. एसबीआय आता डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्मच्या ट्राजेक्शनसाठी होणाऱ्या वापरासाठी क्रेडिट कार्डाच्या रिवॉर्ड पॉइंटचा फायदा देणार नाही. तसेच १ डिसेंबरपासून एचडीएफसी बँकही त्यांच्या क्रेडिट धारकांच्या लाउंज अॅक्सेस नियमांमध्ये बदल करणार आहे.
आयटीआर फायलिंग :-
आर्थिक वर्ष २०२३-२४ साली ३१ जुलैपर्यंत आयकर रिटर्न दाखल करण्यास अयशस्वी ठरलेल्यांना डिसेंबरपर्यंत आयटीआर करण्याची संधी आहे. त्यांना ३१ डिसेंबरपर्यंतचा दंड भरून आयटीआर दाखल करावा लागणार आहे. लेट फी ५००० रुपये आहे. तर ५ लाखांहून अधिक कमाई करणाऱ्या करदात्यांना लेट फी १००० रुपये आहे.
ट्रायच्या नियमात बदल :-
१ डिसेंबर रोजी ट्रायच्या उद्देशात आता नव्या ट्रेसिबिलटीचा नियम लागू होणार आहे. या नियमाने ओटीपी सेवांवर परिणाम होणार आहे. ट्रायने स्पष्ट केले आहे की, ‘नियम लागू झाल्यानंतर ओटीपीच्या सेवेत उशीर होणार नाही.
मालदीव टूर महागणार :-
मालदीवमध्ये पुढील महिन्यांपासून डिपार्चर फी वाढवणार आहे. त्यामुळे मालदीवमध्ये जाणाऱ्या पर्यंटकांकडून अधिकचे पैसे आकारण्यात येऊ शकतात. इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांसाठी ३० डॉलरहून (२,५३२ रुपये) ५० डॉलर (४२२० रुपये) मोजावे लागेल. बिझनेस क्लाससाठी ६० डॉलर (५,०६४ रुपये) वाढून १२० डॉलर (१०,१२९ रुपये) मोजावे लागणार आहे. फर्स्ट क्लासच्या पर्यटकांना ९० डॉलरहून (७,५९७ रुपये) २४० डॉलर (२०,२५७ रुपये ) मोजावे लागणार आहे. प्रायव्हेट जेटच्या पर्यंटकांना १२० डॉलरहून (१०,१२९ रुपये) ४८० डॉलर (४०,५१५) पर्यंत पैसे मोजावे लागणार आहे.
एटीएफच्या किंमत बदल होणार :-
एअर टर्बाइन फ्यूलच्या किंमतीत १ डिसेंबर रोजी बदल होणार आहे. यामुळे फ्लाईटच्या तिकीट दरावर परिणाम मिळण्याची शक्यता आहे.