Ladki Bahin Yojana Update : एकनाथ शिंदे सरकारची ही योजना विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरली आहे. गेल्या चार-पाच महिन्यांचे पैसे जवळपास दोन कोटी ३२ लाख महिलांच्या खात्यात वळते करण्यात आले होते.
पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये..
महाराष्ट्राचा एकतर्फी निकाल लाडक्या बहिणींनी लावल्याचे बोलले जात आहे. मतदानाची वाढलेली टक्केवारी ही लाडक्या बहिणींची असल्याचे दावे केले जात आहेत. अशातच या लाडक्या बहिणी नव्या सरकारच्या पहिला हप्ता कधी येणार याकडे डोळे लावून बसल्या आहेत. हा हप्ता १५०० रुपये येणार की २१०० रुपये याबाबतही चर्चा होत आहे.
पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये..
एकनाथ शिंदे सरकारची ही योजना विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरली आहे. गेल्या चार-पाच महिन्यांचे पैसे जवळपास दोन कोटी ३२ लाख महिलांच्या खात्यात वळते करण्यात आले होते. नोव्हेंबरमध्ये निवडणूक असल्याने या महिन्याचे पैसेही आगाऊच देण्यात आले होते. यानंतर दिवाळी बोनसही येणार अशी घोषणा अजित पवारांनी केली होती. परंतू दिवाळी बोनस काही आला नाही त्या ऐवजी निवडणूक काळात निवडणूक आयोगानेच ही योजना तात्पुरती थांबविल्याची बातमी आली.
पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये..
आता हा दिवाळी बोनस नवे सरकार देणार का या प्रश्नाकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. याचबरोबर या नव्या सरकारचा पहिला हप्ता १५०० रुपये की आश्वासन दिलेला २१०० रुपये असा येतो याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे सरकारने प्रचार काळात ही योजना सुरुच राहणार असल्यावर जोर दिला होता. अद्याप नोव्हेंबर महिना संपलेला नाही. त्यापूर्वीच राज्यात सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. डिसेंबरचा हप्ता येणार आहे. परंतू, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाणार आहे. यानंतरच हा पहिला हप्ता येण्याची शक्यता आहे.
पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये..
तसेच पुढील महिन्यात हिवाळी अशिवेशन असणार आहे, या अधिवेशनात वाढीव २१०० रुपयांच्या हप्त्यावर घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी आला तर १५०० रुपये आणि त्यानंतर आला तर २१०० रुपये येतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सरकारला आपण बोललो तेच करतो, हे दाखविण्यासाठी अधिवेशनानंतर नव्या सरकारचा पहिला हप्ता जारी केला जाण्याची शक्यता आहे. असे झाले तर लाडक्या बहिणींना थोडी वाट पहावी लागणार आहे. कारण वाढीव हप्त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेली नाही. ती करावी लागणार आहे. यानंतरच सरकार नवीन वाढविलेला हप्ता जारी करू शकणार आहे.