या ठिकाणी बनवता येईल कार्ड
नॅशनल हेल्थ अथॉरिटीच्या वेबसाइट beneficiary.nha.gov.in वर किंवा आयुष्मान ऐप https://play.google.com/store/apps/details?id=com.beneficiaryapp&hl=en_IN&pli=1 किंवा जवळच्या लिस्टेड हॉस्पिटलमधून कार्ड मिळवता येणार आहे. तसेच CSC केंद्रावर जाऊन कार्ड बनवता येणार आहे. अधिक माहितीसाठी 14555 या क्रमांकावर कॉल करावा. आयुष्मान भारत वय वंदना कार्डची नोंदणी करणे सोपे आहे. त्यासाठी काही स्टेप पूर्ण केल्यावर कार्ड मिळणार आहे.
अशी करा प्रक्रिया
लाभार्थी म्हणून तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवर आयुष्मान ॲप डाउनलोड करावे लागेल.
कॅप्चा प्रविष्ट करा. त्यानंतर मोबाइल नंबर टाकून ओटीपी आल्यावर तो टाका.
लाभार्थी तपशील भरा, आधारचा तपशील भरा.
त्यानंतर जर लाभार्थी मिळाला नाही तर ई-केवायसी प्रक्रियेचे अनुकरण करा.
घोषणा फॉर्म भरा, फोटो काढा आणि अतिरिक्त तपशील भरा.