वेगवेगळ्या परिस्थितींसाठी किती विमा? जर तुम्ही वर नमूद केलेले एटीएम कार्ड वापरत असाल, तर तुम्हाला त्यानुसार विमा दिला जातो, ज्यामध्ये जो कार्डधारक एक हात किंवा एका पायाने अपंग आहे, त्या व्यक्तीला 50 हजार रुपयांचा विमा दिला जातो. तसेच एखाद्याचे दोन्ही हात किंवा पायांना अपंगत्व आलेले आहे किंवा मृत्यू झाल्यास कार्डानुसार त्या व्यक्तीला 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा दिला जातो. जर एखाद्या कार्डधारकाचा अकाली मृत्यू झाला, तर त्याच्या नॉमिनी संबंधित बँकेच्या शाखेत दाव्यासाठी अर्ज करू शकता. त्यासाठी एफआयआरची प्रत, उपचार प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतील. यामुळे काही दिवसांनी मृत झालेल्या कुटुंबियांना बँक खात्यात क्लेम येतो. तसेच एटीएम कार्डधारकाचा मृत्यू झाल्यास अशा परिस्थितीत कार्डधारकाच्या नॉमिनीने मृत्यू प्रमाणपत्र, एफआयआर प्रत, आश्रितांचे प्रमाणपत्र, मृत व्यक्तीच्या प्रमाणपत्राची मूळ प्रत सादर करावी लागते. या सर्व प्रक्रियेनंतर तुम्हाला विमा मिळतो.